नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना चे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होतील याची वाट शेतकरी पाहत आहेत पी एम किसान प्रमाणेच ही योजना सुरू केलेली आहे

नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये मिळतात म्हणजेच प्रत्येकी तीन हप्त्यांमध्ये पैशाचे वाटप होते प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास पाच हप्त्यांचे पैसे म्हणजेच दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत महाराष्ट्र राज्यातील जवळपास 91 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे

पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आलेले आहेत आणि लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे म्हणजे तीन हजार रुपये 7 मार्चला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मात्र आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होतील याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही

नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारकडून राज्यामध्ये राबवली जात आहे महाराष्ट्र राज्य कृषी विभागाकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेची सुरुवात ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना करण्यात आलेली आहे तेव्हापासून आतापर्यंत जवळपास नमो शेतकरी योजनेचे पाच हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहेत ऑक्टोंबर महिन्यात वाशिम येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमांमध्ये पीएम किसान चे 18 व्या हप्त्याचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले

नमो शेतकरी योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील जवळपास 91 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो आतापर्यंत नमो शेतकरी योजनेसाठी जवळपास 9 हजार कोटी रुपये एवढा खर्च झालेला आहे

Leave a Comment