जिल्ह्यातील 23 हजार लाडक्या बहिणी अपात्र खात्यात जमा होणार नाहीत पैसे

नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भरलेल्या अर्जाची फेर तपासणी झालेली आहे आणि जवळपास 23778 हजार महिलांचे अर्ज बाद झालेले आहे काही अर्ज तर अटीची पूर्तता न केल्यामुळे देखील अपात्र झालेले आहे

महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारने विधानसभा च्या निवडणूक होण्याच्या अगोदरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेला महाराष्ट्रातील महिलांचा पूर्ण प्रतिसाद मिळालेला आहे आणि यामुळे महायुतीला या योजनेच्या माध्यमातून मतदान देखील अधिक मिळालेले आहे

बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 6 लाख 71 हजार महिलांनी अर्ज भरलेले होते पण याच्यामध्ये फक्त पात्र लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे जवळपास नियमाचे नाव पालन न केल्यामुळे 23 हजार 778 महिलांचे अर्ज लाडके बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहेत

लाडकी बहीण योजनेची पुन्हा राज्यस्तरावर फेर तपासणी सुरू देखील करण्यात आलेली आहे या फेर तपासणीमुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचे अर्ज वगळण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये आपण पाहिले तर 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न आणि नोकरदाराची पत्नी आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही यामुळे जवळपास जिल्ह्यातील 23,778 महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे

लाडकी बहीण योजना ही 2024 मध्ये सुरू करण्यात आलेले आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये महिन्याला मिळत आहेत या मोहिमेतून जवळपास 6 लाख 71 हजार महिलांना या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 10हजार 500 रुपये एवढी रक्कम मिळालेली आहे मात्र याच्यामध्ये जर फेर तपासणी मध्ये महिला चे अर्ज अपात्र केले जातील

बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 23 हजार महिलांना लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्यातील पैसे मिळणार नसल्याचे स्पष्ट देखील झालेले आहे या जिल्ह्यातील जवळपास 6 लाख 71 हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे

Leave a Comment