नमस्कार शेतकरी मित्रांनो जमिनीचा मालकी हक्क कसा सिद्ध करायचा त्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे कोणती लागतात ते आज पाहणार आहोत जमिनीचे मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाद होतो त्यामुळे हे प्रकरण पार हाताच्या बाहेर जाण्याची वेळ सुद्धा येते जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत
आवश्यक कागदपत्रे
जमिनीचे खरेदी खत
जमिनी खरेदी विक्री करताना आणि जमिनीचा व्यवहार करताना मूळ मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी खरेदीखत याचा उपयोग होतो खरेदी खत म्हणजे जमिनीचा प्रथम पुरावा समजला जातो आणि या खरेदीखतावर जमिनीचा व्यवहार आणि किती तारखेला झाला आणि हा व्यवहार कोणत्या दोन व्यक्तींमध्ये किंवा क्षेत्रावर आणि किती रुपयांनी झाला याची संपूर्ण माहिती ही खरेदी खतावर असते
सातबारा उतारा
जमिनीचा उतारा हा जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उतारा आहे गाव नमुना मध्ये सातबारा शेतकऱ्याकडे किती जमीन आहे आणि त्या शेतकऱ्याचा किती जमिनीवर हक्क आहे हे सर्व याच्यावर नमूद केले असतात यामुळे जमिनीचा खरा मालक कोण आहे आणि त्याची ओळख पटण्यास सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत होते याचबरोबर सरकारने डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा उतारा देखील उपलब्ध केलेला आहे
खाते उतारा किंवा आठ
शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट नंबर वर असतात त्यामुळे सर्व गट नंबर मधील जमिनीची माहिती ही माहिती एकत्र करून खाते उताऱ्या वरती नोंदवली जाते आठ उताऱ्यामुळे एक या गावांमध्ये तुमच्या नावावर किती जमीन आहे आणि कोणत्या गटात आहे त्याची माहिती मिळू शकते यासाठी आठ हा महत्त्वाचा दस्तावेज आहे
जमीन मोजणी नकाशा
आपण जर पाहिलं तर जमिनीच्या मालकी हक्क संदर्भात काही वाद झाला तर त्यावेळेस जमिनीची मोजणी केली जाते यावेळेस तुमच्याकडे जमीन मोजणी नकाशा असणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही जमिनीवर तुमचा मालकी हक्क सिद्ध करू शकता त्यामुळे जमिनीची मोजणी नकाशे जपून ठेवणे खूप गरजेचे आहे एखाद्या गट नकाशातील शेतजमीन कोणाच्या नावावर आणि ती किती आहे याची सविस्तर माहिती ही नकाशा वरती मिळते
जमीन महसूल च्या पावत्या
शेतकरी जमिनीचा दरवर्षी महसूल भरत असतो त्यानंतर तलाठ्या मार्फत दिली जाणारी पावती ही जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा पुरावा असू शकतो च्या पावत्या जपून ठेवणे खूप आवश्यक आहे
जमीन संबंधित पूर्वीचे खटले
तुमच्या जमिनीवर एखादा वाद असेल किंवा एखादी केस असेल अशी कागदपत्रे आणि निकाल अशी कागदपत्रे जपून ठेवली पाहिजेत कारण याचं महत्त्व जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी होऊ शकतो
प्रॉपर्टी कार्ड
तुमची बिगर शेती जमिनीची मालमत्तेच्या हक्क विशेष माहिती सांगणारा कागदपत्र म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आहे